हायकमांडने संधी दिल्यास लोकसभा लढविणार: सुशीलकुमार शिंदे

विजयकुमार सोनवणे 
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

अक्कलकोट तालुक्‍यातील घुगरेगाव येथील पुलाचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते बुधवारी दुपारी झाले. या कार्यक्रमास आमदार सिद्धाराम म्हेत्रेही उपस्थित होते. "कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढविणार,'' असे सुतोवाच श्री. शिंदे यांनी केले. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांच्याशी काही वेळापुर्वी  संपर्क साधला असता, त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत आपली भूमिका मांडली. 

सोलापूर : "पक्षाच्या हायकमांडने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार आहे,'' असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

अक्कलकोट तालुक्‍यातील घुगरेगाव येथील पुलाचे लोकार्पण शिंदे यांच्या हस्ते बुधवारी दुपारी झाले. या कार्यक्रमास आमदार सिद्धाराम म्हेत्रेही उपस्थित होते. "कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढविणार,'' असे सुतोवाच श्री. शिंदे यांनी केले. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांच्याशी काही वेळापुर्वी  संपर्क साधला असता, त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत आपली भूमिका मांडली. 

शिंदे म्हणाले, "सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांमुळे मी अनेक पदे मिळवली. तब्बल 12 निवडणुकीमध्ये विजयी केले. लोकसभेची जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतानाही मला विजयी केले. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी देशाचा गृहमंत्री आणि लोकसभेचा नेताही होऊ शकलो. आताही त्यांचा आग्रह असेल तर मी निश्‍चित निवडणुकीच्या रिंगणात उतरेन.'' 

लोकांचा आग्रह आणि हायकमांडने दिलेली संधी जुळून आली तर सोलापूरकर मला पुन्हा निश्‍चित संधी देतील. केंद्र व राज्य शासनाच्या पोकळ आश्‍वासनांना मतदार कंटाळले आहेत. त्यांचा सरकारवरील विश्‍वास उडाला आहे. येणाऱ्या काळात कॉंग्रेसच सत्तेवर येणार असल्याने प्रलंबित कामे मार्गी लागतील. केंद्र व राज्य शासनाच्या सध्याच्या भूमिकेमुळे मतदारांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचा निश्‍चितच फायदा देशात कॉंग्रेस व मित्रपक्षाला होईल, असेही शिंदे म्हणाले. 

Web Title: Sushilkumar Shinde talked about contest Loksabha election