'काँग्रेस आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सुशीलकुमार शिंदे यांचा गाव दौरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

काँग्रेस आपल्या दारी या उपक्रमांतर्गत व लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोहोळ तालुक्यांतील गाव भेट दौऱ्यास वडवळ येथून नागनाथ महाराजांना नारळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.

मोहोळ - 'गेल्या साडेचार वर्षात भाजपा-सेनेच्या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली नाही. गावातलं पोरगं गावातच आहे, कुठेय नोकरी?, शेती मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खासदार बनसोडे यांची कामगिरी समाधानकारक नाही. त्यासाठी येत्या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन करावे,' असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले.

'काँग्रेस आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत व लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोहोळ तालुक्यातील गाव भेट दौऱ्यास वडवळ येथून नागनाथ महाराजांना नारळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी पाटिल यांच्या समवेत महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा इंदुमती पाटिल,कार्याध्यक्ष शाहीन शेख, मोहोळ तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, ऍड. पोपट कुंभार, सुरेश शिवपूजे, प्रा. माणिक गावडे, सन्तोष शिंदे, किशोर पवार, दाजी कोकाटे, भीमराव वसेकर आदी जणांचा दौऱ्यात समावेश आहे.

जिल्हाध्यक्ष पाटील व त्यांचे सहकारी गेल्या साडेचार वर्षातील या सरकारची कामगिरी व गेल्या पंचवीस वर्षातील माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कामाचा लेखाजोखा गावकऱ्यांसमोर समोर मांडत आहेत त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गणातील वडवळ, रामहिंगणी, गोटेवाडी, नांदगाव, मुंडेवाडी, सय्यद वरवडे, ढोक, बाभूळगाव, लांबोटी, अर्जुन सोंड, चिंचोली काटी, पोफळी, विरवडे खुर्द गावांचा दौरा केला.

Web Title: Sushilkumar Shindes village tour under the initiative of Congress Your Dari