पेट्रोल पंप दरोड्यातील एका संशयितास अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019


सोनई : घोडेगाव (ता. नेवासे) शिवारातील पागिरे पेट्रोल पंपावर दरोडा टाकून पसार झालेल्या
टोळीचा सुगावा लागला असून, सोनई पोलिसांनी आज एका संशयितास अटक केली.

सोनई : घोडेगाव (ता. नेवासे) शिवारातील पागिरे पेट्रोल पंपावर दरोडा टाकून पसार झालेल्या
टोळीचा सुगावा लागला असून, सोनई पोलिसांनी आज एका संशयितास अटक केली.

नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पागिरे पेट्रोल पंपावर शुक्रवारी पहाटे दहा ते पंधरा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. कोयता, कुऱ्हाड व दांडक्‍यांचा वापर
करत तिघांना मारहाण करून 25 हजारांची रोकड आणि अन्य असा 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला होता. दरम्यान, पेट्रोल पंप कर्मचारी व ट्रकचालकाला दरोडेखोर मारहाण करत असतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले. याच आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली.

पोलिस पथकाने पिंप्री अवघड (ता. राहुरी) येथील नदीच्या पुलाजवळ लपून बसलेल्या अरीफ रऊफ शेख (रा. पिंप्री अवघड) या संशयितास अटक केली. अन्य संशयितांना लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी सांगितले.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspect arrested in a petrol pump robbery