कोल्हापूर येथे गोळीबारात संशयित जखमी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कोल्हापूर - गंभीर गुन्हे दाखल असलेला संशयित विजय उर्फ काळबा रामभाऊ गायकवाड वय 48 (रा. टेंबलाईवाडी उड्डाणपुल परिसर) हा आज सायंकाळी गोळीबारात जखमी झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस त्याला पकडण्यास गेल्यानंतर महाडिक माळ येथील झटापटीत हा प्रकार घडला. उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे प्रचंड मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नातेवाईकांनी पोलिसांनीच त्याचावर गोळीबार केल्याचा आरोप करत सीपीआर मध्ये गोंधळ घातला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. टेंबलाई रेल्वे फाटक येथील विजय उर्फ काळबा याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध पोलिस घेत होते. तो आज सायंकाळी चारच्या सुमारास महाडिक माळ येथील सासुरवाडीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक येथे दाखल झाले. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची त्याच्याशी झटापट झाली. यातच त्याच्या तोंडावर गोळी लागुन तो जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. नातेवाईकांनी यावेळी दहा ते पंधरा पोलिस आले त्यांच्या हातात दोन पिस्तुल होत्या त्यातील एका पिस्तुलाने पोलिसांनीच विजयवर गोळीबार केल्याचा आरोप केला. 

Web Title: Suspected Injured in the shootout at Kolhapur