प्राथमिकचे शिक्षणाधिकारी घाटगे निलंबित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अवहेलना करत त्यांनी हे परिपत्रक काढल्याने शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी शिक्षणाधिकारी घाटगे यांना निलंबित केले आहे.

सोलापूर - भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आल्याचा शोध लावत जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये हा दिवस कसा साजरा करावा याचे मार्गदर्शन करणारे परिपत्रक सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी घाटगे यांनी काढले होते.

वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अवहेलना करत त्यांनी हे परिपत्रक काढल्याने शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी शिक्षणाधिकारी घाटगे यांना निलंबित केले आहे.

14 फेब्रुवारीला मुलांच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांकडून त्यांचे औक्षण करावे, यासह विविध कार्यक्रम शाळास्तरावर राबविण्याची सूचना शिक्षणाधिकारी घाटगे यांनी परिपत्रकात केली होती. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्चला फाशी देण्यात आली होती. शिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीची तारीख देऊन काढलेल्या या परिपत्रकाची गंभीर दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली. हे परिपत्रक रद्द करत सोलापूरचे शिक्षणाधिकारी घाटगे यांच्यावर कारवाईची सूचना प्रधान सचिवांना दिली होती.

शिक्षणाधिकाऱ्यांनी धोरणात्मक परिपत्रके आपल्यास्तरावर काढू नयेत अशी सूचनाही त्यांनी केली आहे. घाटगे यांना निलंबित केल्यानंतर निलंबित कालावधीसाठी त्यांना सोलापूर मुख्यालय देण्यात आले आहे.

Web Title: Suspended primary education officer