‘या’ आमदारांचा भाजप प्रवेश हाेणार का?

हुकूम मुलाणी 
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

आमदार भारत भालके यांच्या पक्ष प्रवेशातील असलेला सस्पेन्स आज संपणार असल्याचे शक्यतेने जोर धरला.

मंगळवेढा : गेल्या आठवडाभरापासून पंढरपूर मतदारसंघातील आमदार भारत भालके यांच्या पक्ष प्रवेशातील असलेला सस्पेन्स आज संपणार असल्याचे शक्यतेने जोर धरला. याबाबत भालके यांच्याशी संपर्क साधला असता आपणास प्रवेशाबाबत निरोप नाही आपण सध्या वैद्यकीय उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार संघातील राजकीय गुंता शिवसेनेने व  काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाही.गेल्या अनेक दिवसांपासून आ. भारत भालके पक्ष सोडणार असलेल्या शक्यतेने जोर धरला परंतु याबाबत अधिकृत निर्णय होत नसल्यामुळे या मतदारसंघात सस्पेन्स कायम राहिला होता. 2009 साली स्वाभीमानीकडून आमदार झालेल्या आ भालके यानी गत  विधानसभा निवडणूकीपुर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मार्गी लावावी या अटीवर त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यानंतर ते काँग्रेसमधून आमदार झाले. पण या पाच वर्षात या योजनेची प्रगती झाली नाही, साखर कारखानदारीला अडचणी लक्षात घेता त्यांना सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून या प्रश्न न्याय मिळू शकेल या आशेने भाजपा जाण्याची मानसीकता करावी अशा इच्छा समर्थकांनी  मांडली यासाठी मंगळवेढ्यात मेळाव्यात मी घेत असलेल्या निर्णयास आपले समर्थन आहे का असा हात वर करून जनतेला विचारून कौल घेतला.

आमदार भारत भालके यांनी भाजपा प्रवेशामुळे पंढरपूर सांगोला माढा मोहोळ या चार तालुक्यातील त्याच्या समर्थकांचे बळ भारतीय जनता पार्टीला मिळू शकणार आहे.तसा गुप्तचर खात्याचा अहवाल देखील दिल्याचे वृत्त आहे.परंतु भालके यांच्या भाजप प्रवेशानंतर पंढरपूर विधानसभेची जागा युतीत कोणत्या पक्षाला हा घोळ अजून संपुष्टात आला नाही. दरम्यान भाजपला ही जागा दिल्यास शिवसेनेच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माजी तालुकाध्यक्ष येताळा भगत यांनी केला. त्यामुळे मतदारसंघातील भविष्यातील राजकीय घडामोडी निर्णायक  वळणावर येऊन ठेपल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspense of MLA Bhalke's entry into BJP