दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा स्वाभिमानीतर्फे निषेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

सांगली - दिल्ली येथे शेतकरी मोर्च्यावर झालेल्या पोलीस हल्ल्याचे आज सांगलीत संतप्त पडसाद उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

सांगली - दिल्ली येथे शेतकरी मोर्च्यावर झालेल्या पोलीस हल्ल्याचे आज सांगलीत संतप्त पडसाद उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा धडकला होता. दरम्यान या मोर्चावर पोलिसांनी बळाचा वापर करत शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून शेतकऱ्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी करण्यात आलेल्या या हिंसेच्या घटनेचे आज सांगलीमध्ये संतप्त पडसाद उमटले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आला आहे. 

Web Title: Swabhimani Agitation