स्वाभिमानी दूध आंदोलनात येलूर फाट्यावर टॅंकरमधील दूध रस्त्यावर सोडले 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 July 2020

सांगली,ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचा भडका आज उडाला. पुणे-बंगळूर रोडवरील येलूर फाट्यावर आज पहाटे गोकुळ दूध संघाचा पंचवीस हजार लिटरचा टॅंकर दूध रस्त्यावर ओतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

सांगली,ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचा भडका आज उडाला. पुणे-बंगळूर रोडवरील येलूर फाट्यावर आज पहाटे गोकुळ दूध संघाचा पंचवीस हजार लिटरचा टॅंकर दूध रस्त्यावर ओतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

राज्यात पाणी महाग आणि दूध स्वस्त अशी विदारक परिस्थिती आहे, या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील काही संघानी संकलन बंद ठेवले. 

जिल्हाध्यक्ष खराडे म्हणाले," सध्या गायीचे दूध 15-18 रुपये आहे तर पाण्याची बाटली वीस रुपये आहे. याचाच अर्थ पाणी महाग आणि दूध स्वस्त हे वास्तव आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील अर्थकारण दूध व्यवसायावर अवलंबून आहे. कोट्यवधी छोटे मोठे शेतकरी दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहेत, मात्र दूध दर कमी झाल्यामुळे संपूर्ण अर्थकारण कोलमोडले आहे. त्यामुळेच दूध दरात वाढ होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने गरज नसताना 10 हजार टन दूध भुकटी आयातीचा निर्णय घेतलाय. देशात गाय दुधापासून भुकटी केली जाते. आयात भुकटीवरील आयात करही कमी केल्याने तिची किंमत कमी आहे. त्यामुळे देशातंर्गत भुकटीची विक्री कमी होणार आहे. त्यामुळे दुधाचे दर आणखी कमी होतील. 
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बंद आंदोलन सुरु आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Swabhimani Dudh Andolan, milk from tankers was released on the road at Yelur Fateh