वारकऱ्यांना दूध वाटप करून स्वाभिमानीचे आंदोलन

किरण चव्हाण
सोमवार, 16 जुलै 2018

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील रिधोरे येथे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना दूध वाटप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. 

माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील रिधोरे येथे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना दूध वाटप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. 

माढा तालुक्यात विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन केले. रिधोरे येथे सकाळपासून संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, तालुका कार्याध्यक्ष सत्यवान गायकवाड, महावीर सावळे, भागवत गायकवाड, विक्रम महाडिक, आलम मुलाणी, बापू गायकवाड, सचिन गायकवाड, संदीप गायकवाड, समाधान गायकवाड, सुहास पाटील, गणेश ढोरे, दादा करळे, अतुल गोडगे, इरफान मुलाणी,  दत्ता पंडित यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सकाळपासून  मराठवाड्याहून बार्शीहून पंढरपूरला पायी जाणाऱ्या पालख्या, दिंडयातील वारकऱ्यांना दूध वाटप केले. आंदोलनाचा भाग म्हणून मोठ्या मोठ्या पातेल्यात रस्त्याच्या कडेलाच दूध गरम करण्यात येत होते. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पालख्या व दिंड्या जात असल्याने अनेक वारकऱ्यांना या आंदोलनातील दूध वाटपाचा लाभ घेतला. काही वारकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या दूधाला चांगला दर मिळण्यासाठी विठ्ठलाला प्रार्थना करणार असल्याचे आंदोलकांना सांगितले. 

एरवी दूध रस्त्यावर ओतून वाया जात असल्याने संघटनेवर ओरड केली जाते. मात्र सोमवारचे दूध वाटप करून. अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनामुळे सध्या दूध घेवून जाणारी वाहनेच रस्त्यावर येताना दिसत नाहीत.

Web Title: Swabhimani Movement by distributing milk to Warakaris