स्वाभिमानी शेतकरी संटनेने जनावरांच्या पाठीवर लिहून केले आंदोलन

किरण चव्हाण
गुरुवार, 19 जुलै 2018

माढा तालुक्यातील रिधोरे येथे तांदूळवाडी, पापनस, शेंद्री, नालगाव, म्हैसगाव  येथील दूध उत्पादकांनी बार्शा - कुर्डूवाडी रस्त्यावर दोन तास रास्ता रोको केला यावेळी सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्या.

माढा (जि. सोलापूर) : स्वाभिमानी शेतकरी संटनेने जनावरांच्या पाठीवर मागण्या लिहून तर शेतकऱ्यांनी रस्त्यातच शिर्षासन करून व जनावरे रस्त्यावर आणून माढा तालुक्यात विविध ठिकाणी अनोख्या पध्दतीने रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केला. 

माढा तालुक्यातील रिधोरे येथे तांदूळवाडी, पापनस, शेंद्री, नालगाव, म्हैसगाव येथील दूध उत्पादकांनी बार्शा - कुर्डूवाडी रस्त्यावर दोन तास रास्ता रोको केला यावेळी सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी "मी पण आले रस्त्यावर" "मालक भाव दिला तरच दूध देणार" असा मजकूर जनावरांच्या पाठीवर लिहून जनावरे रस्त्यावर आंदोलनात आणली होती.

माढयातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी एका शेतकऱ्यांने चक्क रस्त्यातच शिर्षासन केले. शेतकऱ्याच्या शिर्षासनाने माढयात रास्ता रोको झाला. 

रिधोरे येथील आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यद्याक्ष शिवाजी पाटील, स्वाभिमानी पक्षाचे माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, माढा तालुका कार्याध्यक्ष महावीर सावळे, रिधोरे स्वाभिमानी शाखाध्यक्ष मुसा शेख, हनुमंत पाटील, बार्शी अध्यक्ष पिनू जाधव, वैजीनाथ गवळी, शांतीलाल गवळी, अतुल गवळी, भैया पाटील, बापु गायकवाड, आप्पा मेजर, दत्ता पंडित, नितीन गायकवाड, अमोल उबाळे, अस्लम मुलाणी, संदीप गायकवाड, इरफान शेख, अभिजीत ढोरे, दादा करळे, मैनिनाथ परबत, आलम मुलाणी, प्रशांत गायकवाड, किरण ढोरे, भागवत गायकवाड, संदीप गायकवाड तर माढयातील आंदोलनात दिनेश गाडेकर, बाळासाहेब नाईकनवरे, दिनेश जगदाळे, हनुमंत सावंत, छत्रपती भांगे,  पिन्टू भांगे, मधुकर खरात, जीवन सावंत, तानाजी लोंढे, रामलिंग रणदिवे, उमेश भांगे, नाना सांळुखे, पिन्टू चवरे, बालाजी लोंढे, महेश मोहळे, परमेश्वर आतकरे, अमोल लोंढे, बापु लोंढे, सतिश भांगे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatna Agitation At Madha Solapur