स्वाभिमानीतून विकासराव देशमुख यांची हकालपट्टी करा - राम पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

शिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांचेकडे केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील यांनी दिली.

शिराळा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून जिल्हाध्यक्ष विकासराव देशमुख यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांचेकडे केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष राम पाटील यांनी दिली.

विकासराव देशमुख यांनी युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना काल गुरुवारी कोल्हापूर येथे मंत्री सदाभाऊ खोत व शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठिंबा दिला.त्या पार्श्वभूमीवर पाटील बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, संघटनेचा विरोध असताना ज्यांनी कमळाच्या चिन्हावर पंचायत समिती निवडणूक लढवली त्यांनी स्वतःला स्वाभिमानी समजू नये.खरे स्वाभिमानी असता तर कमळाच्या चिन्हावर लढलाच नसता. त्याचवेळी त्यांचे खरे रूप आमच्या लक्षात आले होते.  पंचायत समिती निवडणुकी नंतर आज अखेर संघटनेसाठी त्यांनी किती योगदान दिले. हे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय हा पै पाहुणे व नात्या गोत्याच्या संबंधातून घेतला आहे.
त्यांना आमच्यातून बाहेर पडायचे होते.त्यांनी फक्त ही वेळ साधली आहे. त्यांनी घेतलेली पत्रकार ही कोणा समवेत घेतली याचा विचार केला तर त्यांचे खरे रूप दिसून येते.

शिराळा तालुका स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष मानसिंगराव पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, स्वाभिमानी युवक आघाडीचे शिराळा तालुका अध्यक्ष देवेंद्र धस, उपाध्यक्ष शैलेश पाटील,अशोक दिवे, प्रकाश पाटील, बंडा नांगरे,अरविंद पाटील,भीमाशंकर पाटील,,शिवलिंग शेटे,चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Web Title: Swabhimani Vice President Ram Patil demand