नेवासे फाटा येथे स्वभिमानीच्या 'चक्काजाम' आंदोलनास प्रारंभ

chakkajam
chakkajam

नेवासे : संपूर्ण कर्जमाफी, सात-बारा कोरा करण्यात यावा, कृषी पंपाचे वीजबिल पूर्णपणे माफ करा यासह शेतकऱ्यांच्या महत्वाच्या पाच मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासे फाटा येथे गुरुवार (ता. १०) रोजी आयोजित चक्का जाम आंदोलनास दुपारी एक वाजता प्रारंभ झाला.

स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रा. प्रकाश पोपळे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास कोरडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी संपूर्ण कर्जमाफी, सात-बारा कोरा करण्यात यावा, कृषी पंपाचे वीजबिल पूर्णपणे माफ करा. एफआरपी प्रमाणे एकरकमी पेमेंट व सरकारी अनुदान मिळावे. कांदा व दुधास शासकीय अनुदान मिळावे. शेतकऱ्यांस पेन्शन योजना लागू करावी या मागाण्यांसाठी नगर-औरंगावाद महामार्गावर नेवासे फाटा येथे चक्क जाम आंदोलनास प्रसंभ केला. 

आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रताप पटारे, नेवासे तालुकाध्यक्ष शिवाजी गर्दे, डॉ. अशोक ढगे, त्रीमुर्तीचे अध्यक्ष साहेबराव घाडगे, शेतकरी नेते पी.आर. जाधव, संतोष रोहम, सचिन वर्पे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, गणेश चौगुले सहभागी आहेत. पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com