K-OK swaccha bharat week from 1st September एक सप्टेंबरपासून स्वच्छ भारत पंधरवडा  | eSakal

एक सप्टेंबरपासून स्वच्छ भारत पंधरवडा 

संतोष सिरसट
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. दोन ऑक्‍टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारताचे स्वप्न त्यांना साकार करायचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने आदेश काढत एक ते 15 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. त्याचबरोबर एक सप्टेंबरला स्वच्छतेची शपथही घेतली जाणार आहे. 

स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घ्यायची आहे. या बैठकीमध्ये पालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही स्वच्छतेच्या संदर्भात माहिती करुन देणे, स्वच्छता हे काम नसून चांगली सवय आहे हे त्यांना सांगून या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करायचे आहे. या कालावधीत शिक्षकांनी शालेय परिसरातील स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी करावी. आवश्‍यकता भासल्यास सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी योजना तयार करायची आहे. जिल्हा, तालुका व पंचायत स्तरावर स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर यासाठी स्पर्धांचे आयोजन करावे. विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी चित्रकला स्पर्धा घ्यायच्या आहेत. स्वच्छता या विषयावर वादविवाद स्पर्धा घ्यायच्या आहेत. जुन्या कागदपत्रांची छाननी करुन अनावश्‍यक कागदपत्रे काढून टाकणे, शाळा परिसरातील टाकाऊ साहित्य काढून टाकावे अशाही सूचना दिल्या आहेत. या पंधरवड्यात शाळांनी दररोज स्वच्छतेची शपथ घ्यायची आहे. स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी "विद्यार्थी राजदूता'ची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांची घ्यावी मदत 
या पंधरवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. कारण जिल्हाधिकारी हे सर्व शिक्षा अभियानाचे सदस्य सचिव आहेत. त्या भागातील खासदार हे त्याचे अध्यक्ष आहेत. या समितीची बैठकही या पंधरवड्यात घेण्यास सांगितले आहे. जेणेकरुन याची प्रसिद्धी व प्रसार होण्यास मदत होणार आहे. 

Web Title: swaccha bharat week from 1st September