पांचगणी : मार्गदर्शन करताना लक्ष्मी कऱ्हाडकर शेजारी सुलभा लोखंडे, अर्पणा कासुर्डे व इतर.
पांचगणी : मार्गदर्शन करताना लक्ष्मी कऱ्हाडकर शेजारी सुलभा लोखंडे, अर्पणा कासुर्डे व इतर.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत पांचगणीत कार्यशाळा

भिलार : पांचगणी गिरीस्थान नगरपरिषदेने स्वच्छते मध्ये देशात प्रथम येऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे याचे सर्व श्रेय हे शहरातील प्रत्येक घटकांचे आहे. आगामी काळात केंद्र शासनाच्या आदेशानुसार घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छता अभियान एक जनआंदोलन असल्याने या अभियानाची उद्धिष्ट साध्य करण्याकरिता शहरातील सर्व घटकांनी पुन्हा एकदा आपला सहभाग नोंदवित स्वच्छतेत सातत्य ठेवण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी केले.

नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीत सौ कऱ्हाडकर बोलत होत्या. यावेळी पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या या अभियानासाठी स्वछाग्रही नेमणूका करण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्षा सुलभा लोखंडे, नगरसेविका उज्जवला महाडीक, अर्पणा कासुर्डे, सुमन गोळे, आशा बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छतेत देशात प्रथम पुरस्कार प्राप्त पांचगणी नगरपरिषद हे स्वच्छता सर्वेक्षण हे अभियान राबविण्याकरिता सहभागी होत आहे. त्यानुसार शहरातील नागरिकांनामध्ये जनजागृती होण्याकरिता व स्वच्छता विषयक माहिती देण्याकरिता नगरपालिका कर्मचाऱ्यांना स्वच्छ सर्वेक्षण बाबत नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी यावेळी मार्गदर्शक सूचना दिल्या. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ पुरस्कार प्राप्त पांचगणी नगर परिषद पुन्हा एकदा केंद्र शासनाच्या आदेशाने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेत सहभागी होत आहे. पुन्हा एकदा स्वच्छतेमधील आपलं स्थान अढळ करून देशपातळीवर दबदबा निर्माण करण्यास सज्ज झाली आहे.

शनिवारी कोकण व पुणे विभागातील सर्व नगरपरिषदांच्या प्रतिनिधींची विभागीय कार्यशाळा पांचगणित होत असून हि कार्यशाळा पांचगणीमध्ये आयोजित करावी म्हणून नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. या कार्यशाळेत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रशिक्षणार्थी साठी स्वच्छ सर्वेक्षण २०१९, ओडिएफ + ओडीएफ ++ स्टार रेटिंग ची माहिती राज्य अभियानाच्या तज्ञांकडून दिली जाणार आहे. त्यानंतर तज्ञ कमिटी पांचगणी नगरपरिषदने स्वच्छ सर्वेक्षणात राबविलेल्या विविध उपक्रमांची पहाणी करणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात मुख्य केंद्र बिंदू ठरलेल्या स्वच्छ भारत पॉईंट या पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या स्थळांस भेट दिली जाणार आहे. सिडणे पॉईंट, बसस्टँड, तसेच विविध ठिकाणांना भेटी दिल्या जाणार आहेत त्यांच्या सोबत स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळेस आलेल्या प्रशिक्षणार्थीना यातून प्रत्यक्ष पांचगणी नगरपरिषदेचे सर्वेक्षणतील काम पाहता येणार आहे. त्यातून आपल्या नगर पलिकेस स्वच्छ सर्वेक्षणात काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे.
उपनगराध्यक्षा सुलभा लोखंडे यांनी आभार मानले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत पुणे व कोकण विभागातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती करिता एकदिवशीय विभागीय कार्यशाळा पांचगणी येथील एशिया प्लॅट्यू. एम. आर. ए. सेंटर पांचगणी या ठिकाणी शनिवार दि. २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. कार्यशाळा पांचगणी घेऊन स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या पांचगणी पालिकेच्या स्वच्छतेचे काम सर्व नागरपरिषदांना दाखविण्याची नामी संधी या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com