अध्यक्षा व "सीईओं'ना दिल्लीचे बोलावणे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

सोलापूर - केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत दिल्ली येथे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. 30) दिवसभर ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांना निमंत्रण दिले आहे. 

दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची घोषणा केली होती. येत्या 2 ऑक्‍टोबरला महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या या कार्यशाळेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने केलेल्या कामाची केलेली अंमलबजावणी विचारात घेऊन अध्यक्षा व "सीईओं'ना कार्यशाळेसाठी बोलावण्यात आले आहे. राज्यातील केवळ आठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व सीईओंना यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये सोलापूरसह सिंधुदुर्ग, बीड, सातारा, पुणे, नागपूर, जळगाव, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या आठही जिल्ह्यांत स्वच्छतेच्या संदर्भात झालेल्या कामाची दखल घेऊन या कार्यशाळेसाठी निमंत्रण दिले आहे. या कार्यशाळेसाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार हेही उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन 
शुक्रवारी होणाऱ्या कार्यशाळेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही कार्यशाळा दिवसभर चालणार आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचा मान अध्यक्षा गायकवाड व सीईओ डोंगरे यांना मिळाला आहे.

Web Title: swachh bharat abhiyan workshops will be held on Friday