"स्वच्छ भारत'मध्ये पुणे आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

सोलापूर - पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. या यादीत सांगली दुसऱ्या व नाशिक तिसऱ्या स्थानावर असून, मागील काही महिन्यांत सातव्या क्रमांकावर असलेल्या सोलापूरने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

पुणे जिल्ह्याने आजअखेर एक लाख तीन हजार 901 शौचालये पूर्ण केली आहेत. 62 हजार 761 शौचालये पूर्ण करत सांगली दुसऱ्या, तर 59 हजार 826 शौचालये पूर्ण करत नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. सोलापूर जिल्ह्याने आजअखेर 50 हजार 89 शौचालये बांधून पूर्ण केली आहेत. यंदाच्या वर्षी कृती आराखड्यात सोलापूरमध्ये 60 हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट पाणी व स्वच्छता विभागाने डोळ्यासमोर ठेवले आहे.

Web Title: swachh bharat mission ahead in Pune