रस्त्याच्या कारणावरून तलवारीने हल्ला

चंद्रकांत देवकते
सोमवार, 19 मार्च 2018

बाबा डोंगरे व त्याची पत्नी साधना बाबासाहेब डोंगरे यांनी शिवीगाळ करीत बेसावधपणे डोक्यावर व दंडावर तलवारीने वार केला​.

मोहोळ (जि. सोलापूर) - शेतातील रस्त्याच्या कारणावरून तलवारीने हल्ला केल्याची घटना तालुक्यातील आढेगांव येथे सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आढेगांव येथे फिर्यादी अशोक भानुदास डोंगरे (वय 65) व यांच्याच जवळच्या नात्यातील बाबा नामदेव डोंगरे यांची शेती आहे. मागील काही दिवसापासुन रस्त्याच्या कारणासाठी वरील दोन्ही कुंटुंबामध्ये वाद सुरूच होता. फिर्यादी अशोक डोंगरे हे नेहमीप्रमाणे पहाटे 4 च्या सुमारास पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी डाळींबीच्या बागेतून जात असताना अचानक बाबा नामदेव डोंगरे यांनी समोर येत, तु आमच्या विरोधात अर्ज करतो काय? असे म्हणुन शिवीगाळ करण्यास सुरवात केली. मी त्यांना माझी बाजु सांगत असताना अचानक बाबा डोंगरे व त्याची पत्नी साधना बाबासाहेब डोंगरे यांनी शिवीगाळ करीत बेसावधपणे डोक्यावर व दंडावर तलवारीने वार केला, अशी फिर्याद जखमी अशोक याने दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख हे करीत आहेत.
 

Web Title: sward attack injured police solapur