स्वच्छता कर्मचाऱ्यांची वेतनवाढ चर्चेचीच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

सातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा वर्षाव झाला अन्‌ स्वच्छता व पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा तीन महिन्यांत चर्चाच राहिली असून, ती कागदावर आली नाही. 

सातारा - स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ मध्ये सातारा जिल्हा परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतरच्या सप्टेंबरमधील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा वर्षाव झाला अन्‌ स्वच्छता व पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा तीन महिन्यांत चर्चाच राहिली असून, ती कागदावर आली नाही. 

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान यामध्ये सातारा जिल्हा परिषदेने डंका वाजवला आहे. शिवाय, स्वच्छ भारत अभियानातही देशात सर्वोत्तम कामगिरी केली. त्याला प्रशासकीय वरिष्ठ, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ जितके कारणीभूत आहेत, तितकेच यशाचे वाटेकरी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी आहेत. कंत्राटी पध्दतीने काम करूनही शौचालयांची उभारणी, त्यास अनुदान देणे, देखरेख ठेवणे यांसह घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यापर्यंत आवश्‍यक ती कामे त्यांनी झोकून देवून केली. त्याचे फलित म्हणजे सातारा जिल्हा परिषद स्वच्छतेत सातत्याने अग्रेसर राहिली आहे. 

या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल राज्य शासनानेही घेतली होती. ही कामाची पध्दत जिल्ह्यांत रुजू व्हावी, यासाठी अनेक राज्ये, जिल्ह्यांतील स्वच्छता कर्मचारी साताऱ्यात आले होते.

तसेच येथील १५ कर्मचाऱ्यांनी एक महिना धुळे जिल्ह्यात जावून तेथे स्वच्छताविषयक काम केले होते. २००० पासून या कर्मचाऱ्यांची नेमणूक या विभागात आहे. स्वच्छता सर्वेक्षणात मिळालेल्या यशामुळे जिल्हा परिषदेच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्य भीमराव पाटील यांच्यासह काही सदस्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडून या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अथवा एक वेतनवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. त्याला इतरांनीही प्रतिसाद दिला होता. मात्र, आता पुढील सर्वसाधारण सभा आली तरीही ही चर्चा केवळ कागदावरच राहिली आहे.

‘बडे’ कारनामे कोणाचे?
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेतनवाढ देण्यासंदर्भात पाणी व स्वच्छता विभागाचे सचिव शामलाल गोयल यांच्याशी मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. कैलास शिंदे यांनी चर्चा केली होती. श्री. गोयल त्यावर सकारात्मक असल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही काही अधिकारी कारनामे करून कायद्यातील तांत्रिक त्रुटी पुढे करून अडथळे आणत असल्याची चर्चा आहे. 

कंत्राटी कर्मचारी - ४० 
सेवा कालावधी - १८ वर्षे

Web Title: Swatch Bharat Abhiyan Cleaning Employee Salary