स्वाती शिंदेची ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

महिला कुस्तीच्या आशा पल्लवीत
17 ते 23 जुलै 2018 दरम्यान दिल्ली येथे ज्युनियर आशियायी स्पर्धा होणार आहेत. मातृभूमीत होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सूरज कोकाटे व विपुल थोरात यांनी काल निवड चाचणी यशस्वी केली तर आज महिला कुस्तीत स्वाती शिंदेच्या कामगिरीने महिला कुस्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मुरगूड- लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती केंद्र व डोर्फ केटल कंपनीची दत्तक महिला कुस्तीगीर पै. कु. स्वाती शिंदे हिची ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी आज भारतीय संघातून निवड झाली.

53 किलो वजनी गटात तुल्यबळ कुस्त्या जिंकत स्वातीने हे यश मिळवले. तिच्या वजनी गटात एकूण 7 मुलींपैकी 6 हरियाणा राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर होत्या. तर या स्पर्धेत एकमेव महाराष्ट्राची महिला स्वाती शिंदे ही होती. पहिल्या कुस्तीला स्वातीला बाय मिळाला तर, दुसऱ्या कुस्तीत हरियाणाच्या मीनाक्षीला ४३ सेकंदात झोळी डावावर चितपट करत तिने विजय मिळवला.तिसऱ्या व अंतिम कुस्तीत हरियाणाच्या मंजू वर 6-2 ने विजय मिळवत संघात आपले स्थान पक्के केले.

स्वाती शिंदे ही गेली दोन महीने राष्ट्रीय सराव शिबिरात सराव करते व तिच्या व्यायाम व आहाराची जबाबदारी तिचे प्रशिक्षक पैलवान दादासाहेब लवटे हे तिथे मुक्कामी राहून घेत आहेत.

महिला कुस्तीच्या आशा पल्लवीत
17 ते 23 जुलै 2018 दरम्यान दिल्ली येथे ज्युनियर आशियायी स्पर्धा होणार आहेत. मातृभूमीत होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सूरज कोकाटे व विपुल थोरात यांनी काल निवड चाचणी यशस्वी केली तर आज महिला कुस्तीत स्वाती शिंदेच्या कामगिरीने महिला कुस्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Web Title: Swati Shinde selected in Junior Asian Wrestling Championship