कृष्णेत विमान उडीचा थरार..(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सांगली - येथील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पाण्याची पातळी आज 35 फुटावर आल्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी सूर, गठ्ठा मारून थरार निर्माण केला. अशातच "गावभागाचे विमान' म्हणून परिचित असलेल्या अवलियाने शरीराला विमानाप्रमाणे बनवून थेट डोक्‍यावर नदीत सूर मारून सर्वांनाच अचंबित केले.

कृष्णेची पातळी वाढल्यानंतर आयर्विन पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या मारण्याची परंपरा पट्टीच्या पोहणाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुरू केली आहे. त्यामुळे पुलावरून मारल्या जाणाऱ्या उड्या, गठ्ठा आणि सूर पाहण्यासाठी आज गर्दी झाली होती. डोक्‍यावर हात नेऊन सूर मारणारे अनेकजण आहेत. परंतू दोन्ही हात विमानाच्या पंख्याप्रमाणे बाजूला ठेवून थेट डोक्‍यावर सूर मारणाऱ्या जलतरणपटूंने मात्र थरार निर्माण केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swimming Thrill in Krishna river flood water

टॅग्स