विटा येथे तलवार हल्ल्यात दोघे जखमी

दिलीप कोळी 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

विटा - पंचशिलनगर (विटा) येथे किरकोळ बाचाबाचीतून दोन तरूणावर दहा ते बारा जणांनी तलवार हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मधुकर वायदंडे (वय39) व मोहन वायदंडे (वय46) अशी जखमींची नावे आहेत. हा हल्ला सकाळी अकराच्या सुमारास झाला. जखमी तरूणावर सांगली सिव्हील हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

पंचशिलनगरमध्ये सकाळी वायदंडे यांच्या घरासमोर दहा ते बारा तरूण मोटारीतून आले. त्यांनी  सोबत आणलेली तलवार, लोखंडी पाईप याने मधुकर व मोहन यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात मधुकर यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर मोहन यांच्या हातावर पाईपने मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. मधुकर यांना मारहाण करत असताना त्यांची पत्नी निशा वायदंडे त्यांना सोडविण्यास आली असता हल्लेखोरांनी त्यांच्या उजव्या हातावर लोखंडी पाईपने मारहाण केली. मारहाणीनंतर हल्लेखोर गाडीतून पसार झाले. त्यांचा शोध विटा पोलीस घेत आहेत.

Web Title: sword attack in Vita two injured