खंडणीसाठी युवकावर तलवार हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

सातारा - देगाव फाटा येथील पानटपरी चालकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर टोळक्‍याने तलवार हल्ला केल्याची घटना काल (ता. 10) रात्री उशिरा घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

श्रीकांत जाधव ऊर्फ पप्पू पॅरागॉन, संदीप जाधव ऊर्फ पप्पू टीस, गणेश भोसले, अभिजित आबा जाधव व इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी तेजस भारत भंडलकर (वय 22, रा. कृष्णानगर) यांनी तक्रार दिली आहे. भंडवलकर यांचा देगाव फाटा येथे पानटपरीचा व्यवसाय आहे. काल रात्री 11 वाजता ते पानटपरी बंद करून घरी निघाले होते. दरम्यान, त्या ठिकाणी सर्व संशयित आले. श्रीकांतने तक्रारदाराला "मला हप्ता देऊन धंदा करायचा, नाही तर धंदा बंद करायचा,' अशी धमकी दिली. त्यावेळी तेजसने "हप्ता देणे परवडत नाही,' असे सांगितले. या कारणातून चिडून संशयित चौघांनी शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरवात केली. ही वादावादी सुरू असताना एकाने थेट तलवार काढून वार केला. तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. या मारहाणीत तेजस गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Sword attack on young man for ransom

टॅग्स