नेवाशात राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Symbolic statue of Ram Kadam Burnt in Nevasa
Symbolic statue of Ram Kadam Burnt in Nevasa

नेवासे : मुलींविषयी बेताल वक्तव्य करून स्त्रीशक्तीचा अपमान करणारे हे राम नव्हे तर रावण कदम असून त्यांनी केलेले वक्तव्यबद्दल त्यांचा राजनामा घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुनीता गडाख यांनी केली. 

नेवासे येथील श्री खोलेश्वर गणपती चौकात गुरुवार (ता. 6) रोजी क्रांतिकारी शेतकरी पक्षांच्या महिला आघाडीच्या वतीने आमदार कदम यांच्या पुतळ्याचे माजी सभापती सुनीता गडाख यांच्या नेतृत्वाखाली दहन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

सुनीता गडाख म्हणाल्या, "आमदार हा शासनाचा जबाबदार प्रतिनिधी व रक्षक ही असतो मात्र येथे रक्षणाऐवजी भक्षणाची भाषा होत असेल तर शाळा-महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींना स्वसंरक्षणासाठी पिस्तूलासारखे हत्यार शासनाने द्यावे. नगरसेविका आंबिका इरले, अर्चना वल्ले, रुपाली लिंबोरे यांची भाषणे झाली. त्यांनी आमदार कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली.  महिलांच्या वतीने  तहसीलदार नारायण कोरडे यांना निवेदन देण्यात आले.

क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, के.एच.वाखुरे, नगरसेवक अॅड.बापूसाहेब गायके, लक्ष्मण जगताप, फारुक आतार, सचिन वडागळे, जितेंद्र कु-हे, शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, शिवप्रहारचे दिपक  धनगे, महिला आघाडीच्या प्रतिभा चौधरी, आर्चना कुंभकर्ण, स्वाती मापारी, प्रिया शिंगी, मीना वंजारे, वैष्णवी गवळी,  लता गंधारे, प्रा.वंदना आरक, कु.तेजस्वीनी पाटील, रेणुका शिरसाठ, गायत्री कोरेकर, वैशाली जाधव, उज्वला कडू,  कल्याणी मतकर, प्रतिक्षा खोसे, कु.सना शेख, मशनूम पठाण, शोभा पवार, सईदा शेख, रिजवाना पठाण, अंजली जाधव, ताराबाई जाधव, जनाबाई चौधरी, रुख्मिणी गोरे, नजमा शेख, पुष्पा कळमकर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com