पतंग महोत्सवामुळे टेबल लॅंड ‘कलरफुल्ल’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

भिलार -  ‘आय लव्ह पाचगणी महोत्सवा’तील पतंग महोत्सवाचा पर्यटकांसह विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. दोन दिवस पाचगणीतील टेबल लॅंडचा आसमंत रंगीबेरंगी पतंगांनी ‘कलरफुल्ल’ झाला होता.

भिलार -  ‘आय लव्ह पाचगणी महोत्सवा’तील पतंग महोत्सवाचा पर्यटकांसह विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. दोन दिवस पाचगणीतील टेबल लॅंडचा आसमंत रंगीबेरंगी पतंगांनी ‘कलरफुल्ल’ झाला होता.

आय लव्ह पाचगणी म्हटलं, की विविध नावीन्यपूर्ण उपक्रम डोळ्यासमोर येतात. त्यातील पतंग महोत्सव सर्वांचेच लक्ष वेधून गेला. सकाळच्या थंड, मंद, धुंद वातावरणात या ‘काईट फेस्टिव्हल’चे दिमाखामध्ये उद्‌घाटन झाले आणि निळ्या आकाशात विविध आकार, रंगांचे शेकडो पतंग झेपावले. हे नयनमनोहरी दृश्‍य पाहण्यासाठी हजारो डोळे एकवटले होते. पाचगणीचे विस्तीर्ण असे टेबल लॅंडचे पठार पर्यटक, विद्यार्थी, पतंग प्रेमी आणि नागरिकांनी बहरून गेले होते. 

गुजरातवरून आलेल्या पर्यटकांनी विविध प्रकारच्या मिकी माऊस, डोरेमनच्या गोल, चौकोनी, लांब, दोरीच्या आकाराचे अशा विविध रंगांच्या पतंगांनी टेबल लॅंडच्या आसमंतात जणू राज्य केले होते.

Web Title: Table land ColorFull due to kite festival