ताकारी पाणी योजनेची पाईप फुटली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

ताकारी - ताकारी-म्हैसाळ योजनेची टप्पा क्र. १ व टप्पा क्र. २ च्या दरम्यान असलेली ताकारी हद्दीतील मुख्य लोखंडी पाईपलाईन पाण्याच्या प्रचंड दाबामुळे फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

ताकारी-म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्र.१ कडून टप्पा क्र.२ कडे जाणाऱ्या मुख्य तीन पाईपलाईन आहेत. या पैकी  एक पाईपलाईन सकाळी ११ च्या दरम्यान पाण्याच्या प्रचंड दाबामुळे फुटली. अवघ्या काही मिनिटांतच लाखो लिटर पाणी वाया गेले. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. 

सध्या ताकारी म्हैसाळ योजनेचे ११ पैकी ५ च पंप सुरू आहेत. फुटलेल्या पाइपलाइनमधून वाया जाणारे पाणी जवळच असलेल्या तुपारी हद्दीतील तलावात जाऊन मिळाले. त्यामुळे त्या तलावाला मोठ्या जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले. या मुख्य पाइपलाइनलगतच मोठे व्हॉल्व्ह असल्याने पाइपलाइन व व्हॉल्व्ह यांच्या सुरक्षिततेसाठी याठिकाणी एक बंदिस्त शेड उभारण्यात आले आहे. पाइपलाइन फुटल्यानंतर बाहेर पडणाऱ्या पाण्याचा दाब इतका होता की या शेडच्या पूर्वेकडील तळात असणारी सिमेंट काँक्रिटची भिंत बाजूला सारली गेली व या  भिंतीवर असणारी सिमेंट, विटांची भिंत कोसळली. त्यामुळे लाखो लिटर पाणी जवळच असलेल्या तलावात जाऊन मिसळले व पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला.

Web Title: takari sangli news water scheme pipeline break