'त्या' राजकीय टोळीवर कारवाई करावी- पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघतील एक हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या राजकीय टोळीवर कारवाई करावी. त्या टोळीच्या खोलात जावून तपास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.
 

कऱ्हाड- कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघतील एक हजारापेक्षा जास्त मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणाऱ्या राजकीय टोळीवर कारवाई करावी. त्या टोळीच्या खोलात जावून तपास करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.

सामान्यांचा मतदानाचा हक्कच हिरावून घेणाऱ्या राजकीय टोळीवर कारवाई झालीच पाहिजे, त्यासाठी विशेष लक्ष घालण्याची आग्रही मागणीही चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे केली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

विधानभवनात मलकापूरसह कऱ्हाड शहरातील मतदारांची नावे कमी करण्यासाठी बोगस अर्ज केल्याच्या प्रकरणाकडे त्यांनी लक्ष वेधले. चव्हाण म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदान यादीत नाव वाढवणे किंवा कमी करण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था केली आहे. त्या सगळ्या यंत्रणेचा वापर करून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघात एक हजारपेक्षाही जास्त मतदारांचे बनावट अर्ज भरण्यात आले आहेत. त्या लोकांची मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी ते अर्ज दाखल आहेत. संबधितांना नोटीस आल्यानंतर त्याबाबतची बाजू समोर आली आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरासह मलकापूरातील मातब्बर कुटूंबातील मतदारांसह सामान्य मतदारांचे मतदान यादीतून कमी करावे असे त्या अर्जात म्हटले आहे.

नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल नावाची ऑनलाईन सेवा 2015 साली सुरू केली आहे. त्याद्वारे अर्ज करता येतो. मात्र कऱ्हाड दक्षिण मतदार विधानसभा संघात कोणीतरी राजकीय टोळीचा वापर करून त्या पोर्टलवरून बोगस अर्ज केले आहेत. त्या द्वारे एक हजार 333 नावे कमी करण्याचे त्या अर्जाव्दारे म्हटले आहे. वास्तविक ते अर्ज बोगस आहेत. दुसऱ्यांच्या नावावर अर्ज केला आहे. माहिती तंत्रज्ञाच्या कायद्याचा तो गैरवापर आहे. अशी नावे कमी होतच नाहीत. मात्र गंभीर गुन्हा आहे. त्याबाबत पोलिसात देखील आम्ही दाद मागितली आहे. मात्र जी टोळी येते अशा प्रकारे कार्यरत आहे. त्यांच्यावर निश्चित स्वरूपात कारवाई झाली पाहिजे.

Web Title: take action On Those political people Says Prithviraj Chavan