क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यात व तालुक्यातुन क्षमतेपेक्षा जादा वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करावी तसेच मोहोळ येथे चेकपोस्ट उभारावे अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश काळे यांनी उपप्रादेशीक परिवहन अधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

तालुक्यातील अर्धनारी येथील नदीपात्रातील वाळु ठेका सुरू आहे या ठिकाणाहून टिपर मधुन क्षमतेपेक्षा जादा वाळु वाहतुक केली जात आहे यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच क्षमतेपेक्षा जादा वाळु भरल्याने चालकाला वाहन  नियंत्रण होत नाही त्यामुळे जिवघेणे अपघात होताहेत वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनाकडुन अपघात झाल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासुन वाहन मालक  चालक व ठेकेदार यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मोहोळ येथे वाहतुक मार्गावर चेकपोष्ट उभारावे अशीही मागणी काळे यांनी केली आहे.

निवेदनाच्या प्रती पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत

Web Title: take action on vehicle which carries more than capacity of soil