अंधाराचा फायदा घेऊन 30 तोळे सोन्यावर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

शिवथर : शिवथर (ता. सातारा) येथे विज गेल्याचा फायदा उठवून चोरट्यांनी सुमारे नऊ लाख रुपये किमतीच्या 30 तोळे सोन्याच्या दागिण्यांवर डल्ला मारला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जयवंत महादेव साबळे (रा. शिवथर) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. त्यांचे गावात दुमजली घर आहे. काल रात्री जेवणानंतर सर्वजण झोपी गेले होते. पहाटे दोन ते सहा या कालावधीत गावातील विज गेली होती.

त्यामुळे सर्वत्र अंधार होता. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी जयवंत यांच्या घरातील तिजोरी फोडून सोन्याचे दागिणे असलेले तिजोरी चोरट्यांनी लंपास केली. त्यामध्ये
 सोन्याचे गंठण, मोहनमाळ, अंगठ्या, सोन्याची साखळी, फुले असे सुमारे तीस
लाख रुपयांचे दागिणे होते. 

तिजोरी असलेल्या खोलीत रात्री कोणी झोपले नव्हते. आज सकाळी घरातील लोक तेथे गेल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तातडीने तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तालुका  पोलिसांचे पथक तातडीने गावात दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी  श्‍वान व ठसे तज्ञांचे पथक बोलावण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.

Web Title: Take advantage of the darkness and take 30 tons of gold

टॅग्स