
पालिकेच्या आरोग्य विभागाकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. महापौर व उपायुक्तांच्या दालनात भटकी कुत्री सोडण्याचा इशारा भीम आर्मी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जैलाब शेख यांनी दिला.
मिरज : महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. महापौर व उपायुक्तांच्या दालनात भटकी कुत्री सोडण्याचा इशारा भीम आर्मी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जैलाब शेख यांनी दिला. या बाबतचे निवेदन महापालिकेच्या उपयुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्हणटले आहे की, मिरज शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मुलांसह सकाळी फिरण्यास जाणारे महिला व पुरुषांना याचा त्रास होत आहे. तसेच मिरज येथे एका पाच वर्षीय मुलाची कुत्र्याने लचके तोडून गंभीर जखमी केले आहे.
भटकी कुत्री त्वरित धरून बंदोबस्त करावा व नागरिकांच्या जीवितास होणारा धोका महापालिकेने टाळावा महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास याचा निषेध म्हणून महापालिकेच्या दालनात कुत्री सोडून निषेध व्यक्त करण्याचा इशारा संघटनेने निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी भीम आर्मीचे जैलाब शेख, आरपीआयचे सांगली जिल्हा मीडिया प्रमुख योगेंद्र कांबळे, गुंठेवारी चळवळ समितीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विजय बल्लारी, रिपब्लिकन पार्टीचे अविनाश कांबळे, जमीर शेख आदी उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार