मराठा समाजातील विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच शुल्क घ्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

सोलापूर : छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतून राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पालकांच्या पाल्यांची पन्नास टक्के शैक्षणिक फी राज्य सरकार भरणार आहे. पाल्यांनी प्रवेश घेताना फक्त पन्नास टक्के शुल्क घ्यावे. परंतु बहुतांश महाविद्यालयातून शंभर टक्के फी घेतली जात असल्याचा दावा सकल मराठा समाजाने केला आहे. विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्के शुल्क घ्यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. 

माऊली पवार, रवी मोहिते, प्रियांका डोंगरे यांच्यासह सकल मराठा समाजाच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. शासनाने या शिष्यवृत्ती योजनेचे वेळोवेळी शासन निर्णय घेतले आहेत. हे शासन निर्णय सर्व विभागांना, महाविद्यालयांना माहितीसाठी पाठविण्यात आले आहेत. तरी देखील शंभर टक्के रक्कम भरून प्रवेश दिले जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के रक्कम भरली आहे त्यांनी पन्नास टक्के फी परत मागणीचे अर्ज महाविद्यालयांकडे भरून द्यावेत असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. 

Web Title: Take fifty percent fee from the students of Maratha community