कर्ज काढून दूध उत्पादकांच्या पगारी

कर्ज काढून दूध उत्पादकांच्या पगारी

सोलापूर: दूध उत्पादकांना प्रतिलीटर 27 रुपये दर मिळावा, यासाठी सरकारने भुकटीसाठी दूध घालणाऱ्या सहकारी व खासगी दूध संघांना तीन रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाते. परंतु, मागील महिन्यांपासून तीन कोटी अनुदानच न मिळाल्याने सोलापूर सहकारी दूध संघाने कर्ज काढून दूध उत्पादकांच्या पगारी केल्या आहेत. असे चित्र राज्यभर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याचे दररोजचे दूध संकलन 14 लाख लीटर असून त्यापैकी दिड लाख लीटर दूध सहकारी दूध संघ करते. उर्वरित दूध जिल्ह्यातील 10 खासगी दूध संघाकडून केले जाते. त्यांच्यावर दराचे कोणतेही निर्बंध नाहीत. सहकारी दूध संघांना प्रतिलीटर 27 रुपये दर देणे बंधनकारक केल्यानंतर तो दर नियमितपणे दिला जातोय. परंतु, भुकटीच्या दुधाचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने सहकारी दूध संघांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनस्तरावरुन याबाबत ठोस तोडगा काढण्याची गरज आहे.

आकडे बोलतात... 
सोलापूरचे दूध संकलन 
12.28 लाख लीटर 
सहकारी संघाचे संकलन 
1.48 लाख लीटर 
दूध उत्पादक शेतकरी 
29,472 
अनुदान रखडले 
2.94 कोटी 
भुकटीसाठी जाणारे दूध 
93,700 लीटर 

दूध उत्पादकांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील असलेला सहकारी दूध संघांसमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. भुकटी करण्याचा निर्णय चांगला आहे परंतु, अनुदानाची प्रक्रिया किचकट आहे. दूध उत्पादकांना वेळेवर पैसे मिळणे आवश्‍यक आहे परंतु, शासनाकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने सहकारी संघ कर्ज काढून पगारी करत आहेत. 

- सतीश मुळे, व्यवस्थापकीय संचालक, सोलापूर जिल्हा दूध संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com