मतपत्रिकांच्या आधारे मतदान घ्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सांगली - संपूर्ण राज्यात पार पडलेल्या महापालिका, नगरपालिका, झेडपी, पंचायत समित्यांच्या इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वर झालेल्या निवडणुकी रद्द करून जुन्या मतपत्रिकांच्या आधारावर मतदान घ्यावे. देशात मुक्त, निष्पक्ष, पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ‘लोकशाही बचाव’ समितीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

सर्व पक्षांच्या लोकशाही बचाव समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्याकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले. सर्वपक्षीय शिष्टमंडळात उपमहापौर विजय घाडगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे बजरंग पाटील, पृथ्वीराज पवार, अय्याज नायकवडी, राष्ट्रवादीचे उत्तम कांबळे, मराठा क्रांतीचे डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, प्रा. सिद्धार्थ जाधव, मदनभाऊ पाटील युवा मंचचे सतीश साखळकर, मनसेचे नितीन शिंदे, आवामी पार्टीचे वांकर, प्रशांत सूर्यवंशी, प्रमोद सारनाथ, सुजित लकडे, सतीश पाटील यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की निवडणूक निकालानंतर ईव्हीएम मशीनबाबत निर्माण झालेली गंभीर साशंकता आणि त्याविरोधात वाढत असलेला असंतोष सोशल मीडियातून पाहायला मिळतो आहे. पुणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथील निकालात मशीनमुळे मोठा घोटाळा झाल्याचे गंभीर आरोप आहेत. या शहरातील सर्वपक्षीय पराभूत उमेदवारांनी न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे. भविष्यात इथे होणाऱ्या निवडणुकात असा प्रकार होऊ नये.

सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मतपत्रिका वापरण्याचे आदेश दिले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत मतदाराने स्वतः दिलेले मत शंभर टक्के पाहण्याची किंवा त्यांची प्रिंट काढण्याची सोय असायला हवी, की जेणेकरून फेरमतमोजणी शक्‍य होईल. ज्या केंद्रावर दिलेल्या मताची प्रिंट मिळणार नाही अशा ठिकाणी पुन्हा कागदी मतपत्रिकांवरच मतदान घेतले पाहिजे.

Web Title: Take the voting on the basis of ballet paper