दोन हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात

अमर पाटील
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

बांबवडे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साळशी सज्जात कार्यरत असणारा तलाठी निवास साठे यास दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे जमिनीच्या सात-बारा फेरफार प्रकरणातील कामासाठी महादेव निवृत्ती पाटील (रा. साळशी ता. शाहूवाडी) यांचेकडे दोन हजार रूपयांची लाच साठे याने मागितली होती.  

याबाबत मिळालेली माहिती अशी, महादेव पाटील यांचे सात-बारा उताऱ्यावर नोंद घालावयाची होती. त्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने दस्त नोंद करायची होती. याबाबत ए.के. ५५ कलम अंतर्गत प्रकरण तयार करुन मंगळवारी तहसीलदार यांचेकडे पाठवायचे होते. त्यासाठी दोन हजाराची लाच तलाठी निवास साठे याने महादेव पाटील यांचेकडे मागितली. त्यामध्ये साहेबांना एक हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. महादेव पाटील यांनी सदर रक्कम देण्याचे कबूल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाचे उप अधिक्षक गिरीष गोडे यांच्या पथकाने सापळा रचून पकडले.

Web Title: Talathi arrested in Bribe case