भाऊसाहेब कर्तव्यावर आहेत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

नगर तालुका : नागापूरचे तलाठी कार्यालय बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्या कार्यालयातील तलाठी आजारी असल्याने ही गैरसोय होत होती. महसूल विभागाने पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना हेलपाटे घालावे लागत. "सकाळ'ने शुक्रवारी "भाऊसाहेब आजारी आहेत' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला.

नगर तालुका : नागापूरचे तलाठी कार्यालय बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्या कार्यालयातील तलाठी आजारी असल्याने ही गैरसोय होत होती. महसूल विभागाने पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना हेलपाटे घालावे लागत. "सकाळ'ने शुक्रवारी "भाऊसाहेब आजारी आहेत' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. तलाठी ज्ञानदेव बेल्हेकर यांनी "ऍडमिट' असतानाही कागदपत्रांवर सह्या करून निपटारा करण्यास सुरवात केली आहे. 

गैरसोय दूर झाल्याने नागरिक "सकाळ'ला धन्यवाद देत आहेत. तलाठी बेल्हेकर आजारी असल्याने, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी कार्यालयासमोर "भाऊसाहेब आजारी असल्याने कार्यालय बंद राहील' अशा आशयाचा फलक लावायला सांगितले होते. मात्र, "सकाळ'च्या वृत्तानंतर आज सकाळपासून नागापूर तलाठी कार्यालय सुरू झाले. 

हेही वाचा दारू बंदी झाली नि गावची रया गेली

बेल्हेकर गेल्या महिन्यापासून पंचनामे, शेतकऱ्यांच्या याद्या, त्याचे बॅंक खाते क्रमांक गोळा करण्यात व्यग्र होते. त्यांच्याकडे नागापूर, बोल्हेगाव, शिंगवे, इस्लामपूर, गोटुंबे आखाडा, नांदगाव, सुजलपूर, या गावांची जबाबदारी होती. त्यांनी सर्व माहिती कार्यालयास कळविली. नांदगावात काम करीत असताना त्यांना त्रास होऊ लागला.

 
लोकांनीच त्यांना रुग्णालयात दाखल केले. बेल्हेकर यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदारांच्या कानावर ही माहिती घातली. तसेच, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तो फलक लावला. 

बेल्हेकरांनी सकाळी आपल्या कार्यालयातील लिपिक व अन्य सहकाऱ्यांना कार्यालय सुरू करण्यास, तसेच "नागरिकांचे दाखले व अन्य कागदपत्रे तयार करून दवाखान्यात घेऊन या, म्हणजे सह्या करून देईन,' असे सांगितले. त्याप्रमाणे सहकाऱ्यांनी शुक्रवारी नागरिकांचे दाखले व अन्य कागदपत्रे जमा करून त्यावर तलाठी बेल्हेकर यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर ती कागदपत्रे संबंधितांना दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: talathi bhausaheb on duty