मुंबईत सुरू होणार तलाठी कार्यालये 

हेमंत पवार
मंगळवार, 31 जुलै 2018

कऱ्हाड - पुणे आणि कोकण विभागातील सहा जिल्ह्यांसाठी 269 तलाठी सजे आणि 46 महसुली मंडळांची नवीन निर्मिती केली आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये आतापर्यंत तलाठ्यांचे सजे कार्यरत नव्हते. त्यामुळे महसुली कामात येणाऱ्या अडचणींचा विचार करून शासनाने मुंबईमध्ये पहिल्यांदाच 19 तलाठी सजांची व चार मंडलांची नवनिर्मिती केली आहे. त्यामुळे तलाठी पातळीवरील कामकाज आता मुंबईतही सुरू होणार आहे. 

राज्यात तलाठी सजांची पुनर्रचना करून ते वाढवावेत, अशी मागणी 35 वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. अनेक गावांतील सातबारांचा मेळ घालता- घालता त्यांच्या नाकीनऊ येत होते. त्याचबरोबर एकीकडे अनेक गावांचा कार्यभार आणि ऑनलाइन सातबाराच्या नोंदणीचे काम यामुळे अनेक गावांत तलाठ्याची गाठ पडणेही मुश्‍कील बनले होते. तलाठी संघाकडून त्यासाठी सातत्याने आंदोलने, पाठपुरावा करण्यात येत होता. सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शासनाने पुणे व कोकण विभागातील सहा जिल्ह्यांसाठी 269 तलाठी सजे व 46 महसूल मंडळांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात 32, सोलापुर- 99, पुणे- 8, कोकण विभागातील मुंबईमध्ये 19, सिंधुदुर्ग- 86, तर रायगड- 25 नवीन तलाठी सजे निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पुणे विभागात 23, तर कोकण विभागातील संबंधित जिल्ह्यात 23 नवीन महसूल मंडले तयार करण्यात येणार आहे. 

एका तलाठ्याकडे तीन ते पाच गावांचा कारभार पाहण्याची जबादारी देण्यात आली होती. त्यातच ऑनलाइन सातबाराचेही काम तलाठ्यांकडेच होते. त्यामुळे त्यांची धावपळ होत होती. नवीन सजे सुरू होणार असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन कामे झपाट्याने मार्गी लागण्यास मदत होईल. 

पुणे व कोकण विभागाची चुकीची माहिती शासनाकडे गेली होती. त्यामुळे निर्माण झालेले सजे व आमची मागणी यात तफावत होती. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून नवीन तलाठी सजे मंजूर करून घेतले. त्यामुळे तलाठ्यांवरील कामाचा बोजा कमी होईल. 
- ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, राज्य तलाठी संघ 

Web Title: Talathi offices will be started in Mumbai