विहिरीत उडी घेवून विवाहित पुरुषाची आत्महत्या

हरीभाऊ दिघे
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

तळेगाव दिघे (जि. नगर) - संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात विहिरीत उडी घेवून एका विवाहित पुरुषाने आत्महत्या केली. अजय शांताराम थोरात (वय ३८) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (दि. ५) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान फाटा शिवारात मनोहर सयाजी थोरात यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत अजय शांताराम थोरात या विवाहित पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत पाण्यावर तरंगताना आढळून आला.

शनिवार (दि. ५) सायंकाळपासून ते बेपत्ता होते. याबाबत पोलीस पाटील सुभाष थोरात यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाळंदे व सहाय्यक फौजदार बाळासाहेब घोडे यांनी घटनास्थळी येत मृतदेह विहिरीतून बाहेर काढीत पंचनामा केला. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, पोलीस पाटील सुभाष थोरात, निलेश थोरात, बाळासाहेब गडगे, किशोर थोरात यांनी सहकार्य केले.

त्यानंतर मृतदेह संगमनेर कुटीर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. याप्रकरणी निलेश साईराम थोरात यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजि. क्र. ९३ / २०१७ सीआरपीसी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर व्यक्तीच्या आत्महत्येमागील निश्चित कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक सुनील पाटील व पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाळंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळासाहेब घोडे अधिक तपास करीत आहे. मयत अजय थोरात यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली असून वडगावपान गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: talegaon dighe nagar news man suicide in well