लाच घेताना नेल्याचा तलाठी जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

सातारा - स्मशानभूमी बैठक व्यवस्था व समाजमंदिराच्या बांधकामाचा धनादेश दिल्याच्या मोबादल्यात अडीच टक्‍क्‍यानुसार साडेनऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नेले (ता. सातारा) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

राहुल अंकुश शेळके (रा. 22, एसटी कॉलनी, सातारा) असे त्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराने गावातील स्मशानभूमी बैठक व्यवस्था व समाजमंदिराचे काम केले होते. त्या कामाच्या बिलाचा धनादेश दिल्याबद्दल लाचेची मागणी शेळकेने केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार केलेल्या पडताळणीमध्ये तडजोडीअंती दोन टक्‍क्‍यांप्रमाणे साडेनऊ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार सातारा पंचायत समितीच्या आवारात पैसे स्वीकारताना शेळकेला रंगेहात पकडण्यात आले. निरीक्षक बयाजी कुरळे, सहायक फौजदार जयंत कुलकर्णी, आनंदराव सपकाळ, हवालदार संभाजी बनसोडे, भरत शिंदे, विजय काटवटे, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, प्रशांत ताटे, विनोद राजे, संभाजी काटकर, विशाल खरात, महिला पोलिस जमदाडे, कुंभार व माने यांनी कारवाईत भाग घेतला. 

Web Title: Talithi caught Taking a bribe in satara

टॅग्स