राजू शेट्टी आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीची चर्चा

शिवाजीराव चौगुले
बुधवार, 11 जुलै 2018

शिराळा : नेहमी कारखानदारांच्या विरोधात बोलणारे खासदार राजू शेट्टी यांनी शिराळ्यात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची घेतलेली प्रत्यक्ष भेट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यांच्याशी दूरध्वनीवरून झालेला संपर्क यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून या भेटीची चर्चा तालुक्यात सुरु आहे. तर शिराळा येथे शेट्टी यांच्याकडे आपापल्या गावच्या कामांची मागणी करण्यासाठी निवेदन घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता.

आज शेट्टी शिराळा येथे स्वाभिमानीचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन, बाजार समिती आवारात वृक्षारोपण व तालुक्यातील विविध कामांच्या उदघाटन व शुभारंभाचा निमित्ताने आले होते. बाजार समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे. या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम शेट्टी यांच्या हस्ते झाला. सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या वतीनेही शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख हे बाहेर गावी असल्याने त्यांचे आणि शेट्टी यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले.

चिखली येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असताना शेट्टी यांनी माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची भेट घेतली. त्या भेटीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या भेटीची चर्चा सोसिएल मीडियावर जोरात सुरु आहे.

भेट शेतकऱ्यांसाठी की राजकारणासाठी

खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या ऊस दराबाबत माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याशी चर्चा केली. मात्र  शेतकरी नेहमीच समाधानी राहील याची काळजी विश्वास कारखाना सातत्याने घेत असल्याचा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. हि भेट राजकारणासाठी कि शेतकऱ्यांसाठी हे गुलदस्त्यात राहिले आहे.

Web Title: Talk about meeting Raju Shetty and Congress leaders