सकाळ'च्या उपक्रमाने पोलिसांचे मनोधैर्य वाढेल - बोराटे

सकाळ'च्या उपक्रमाने पोलिसांचे मनोधैर्य वाढेल - बोराटे

सांगली - चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसाठी "सकाळ'ने सुरु केलेला तंदुरुस्त बंदोबस्त हा कल्पक उपक्रम समाजात चांगली संस्कृती रुजविण्यासाठी चांगला आहे. यातून पोलिसांचे मनोधैर्य वाढेल, असे मत सांगलीचे अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सव आणि मोहरमच्या निमित्ताने सतत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी "सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने आज चिक्की आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. 
पोलिस दलाच्या कृष्णा मॅरेज हॉल येथे आज सकाळी हा उपक्रम साजरा झाला.

यावेळी सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी उपस्थित होते. अप्पर अधीक्षक बोराटे म्हणाले, "" चिक्की हे पौष्टिक खाद्य आहे. बंदोबस्तावरील पोलिसांसाठी हे उपयुक्त आहे. यामुळे लोह आणि न्यूट्रीन्स मोठ्या प्रमाणात मिळतात. शरिराच्या तंदुरुस्तीसाठी हे महत्वाचे आहे. शरिराचा आणि मनाचा ताण कमी करण्यासाठी व्यायाम, पौष्टिक आहार आणि मेडिटेशन या आवश्‍यक बाबी आहेत. पोलिस समाजासाठी काम करतात. त्यांच्याकडून छोट्या मोठ्या चुका होतात. पण त्याचे मनोधैर्य खच्चीकरण होऊ नये यासाठी त्यांच्या पाठिशी उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले. 

विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, माझ्या प्रभागात ग्रामीण आणि शहर पोलिस स्टेशन आहे. पोलिस वसाहत आहे. त्यामुळे पोलिसांशी माझा संपर्क येतो. महापालिकेच्या वतीने पोलिसांसाठी पुरेशी सुविधा देऊ शकत नाही याची खंत आहे. मात्र यापुढे पोलिस वसाहतीमधील समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो. 

सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी "सकाळ' माध्यम समूहाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमाचा उद्देश त्यांनी सांगितला. यावेळी पोलिसांना प्रातिनिधीक स्वरुपात चिक्की आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृष्णाई संस्थेचे प्रतापराव चव्हाण व टीमने पोलिसांना फळे वाटपही केले. 

या कार्यक्रमास सकाळचे वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, ऍग्रोवनचे व्यवस्थापक शीतल मासाळ, सांगली वितरण विभाग प्रमुख श्रीधर जोग यांनी स्वागत केले. यावेळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. गीतांजली पाटील यांनी सूत्रसंचलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com