महिला सुरक्षिततेप्रश्‍नी "तनिष्कां'चा एल्गार

Dr. Veterinary Officer at Hyderabad The burning of Priyanka Reddy alive is haunting the human race. The protesters condemned the incident.
Dr. Veterinary Officer at Hyderabad The burning of Priyanka Reddy alive is haunting the human race. The protesters condemned the incident.

सातार : साताऱ्यासह जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर झाला असून, पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलावीत, असे निवेदन तनिष्का व्यासपीठाच्या वतीने नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना दिले.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
हैदराबाद येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका रेड्डी यांना जिवंत जाळण्याची घटना मानव जातीस काळिमा फासणारी आहे. त्या घटनेचा आम्ही निषेध करतो, तसेच संबंधित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी. आजही महिला व मुली समाजात सुरक्षित नसल्याच्या घटना घडत आहेत.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर जलद गती न्यायालयात खटले चालवून कठोर शिक्षा द्याव्यात. जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही गंभीर होत आहे. मुली व महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहते. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. महिलांच्या सुरक्षेसाठी तनिष्का व्यासपीठ कायम सहकार्य करत राहील, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

हेही वाचा - तरुणीची गाडी आराेपींनीच पंक्चर केली; हैदराबादप्रकरणी धक्कादायक खूलासा

त्यावेळी डॉ. पल्लवी साठे, स्मिता पाटील, अनिता गायकवाड, उज्ज्वला संकपाळ, मंदा शेलार, सीमा जाधव, अरुणा चव्हाण, विजया साळुंखे, मृणालिनी बोराटे, शीतल चव्हाण, रेवती बर्गे, तनिष्का व्यासपीठ व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण उपस्थित होते.
सातारा सातारा सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com