रणरागिनी, घे भरारी गगनावरी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

सकाळ तनिष्का व्यासपीठ निवडणुकीला जिल्ह्यात महिलांचा प्रतिसाद

कोल्हापूर - महाराष्ट्राचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी सकाळ तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानांतर्गत झालेल्या निवडणुकांमध्ये समाजाच्या विविध स्तरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिलांनी भरघोस मतदान करत तनिष्का व्यासपीठाला मोठे पाठबळ दिले. जिल्ह्यातील उच्चशिक्षित, नोकरदार महिलांपासून ते शेतात राबणाऱ्या महिलांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर रांगा लावून झालेल्या मतदानाने चुरस दिसली. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली.

दुपारी दोन वाजेपर्यंत महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. मिसकॉलद्वारेही उच्चांकी मतदानाची नोंद झाली. मतदान केंद्रात प्रवेश होताच निवडणूक अधिकारी कक्षाच्या टेबलावर मतदानाची नोंद होत होती. मतदानाबाबत महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसत होती. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष मतपेटीजवळ जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला महिला मतपत्रिका टाकत होत्या. सकाळी अकरानंतर खऱ्या अर्थाने गटागटाने महिला येत होत्या. त्यानंतर मतदान प्रक्रियेत भाग घेत होत्या. इचलकरंजी, कागल, जयसिंगपूर, गडहिंग्लज, पेठवडगाव, पन्हाळा, मुरगूड, मलकापूर या आठ ठिकाणी मतदान झाले. मतदानासाठी अनेक महिला आपल्या मैत्रिणींसह मोटारसायकलवरून दाखल होत होत्या.

महिलांसाठी उपयुक्त अशा विविध उपक्रमांत सहभाग तसेच नेतृत्वाची आवड असणाऱ्या महिला निवडणूक रिंगणात होत्या. गेला आठवडाभर त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवत ‘सकाळ’च्या या उपक्रमात आपली सक्रियता दर्शविली.

प्रथम क्रमांकाचे उमेदवार
इचलकरंजी    अश्‍विनी विजय कोळेकर
कागल    डॉ. स्नेहा सत्येन माळकर
जयसिंगपूर     प्राजक्ता रवींद्र पाटील
गडहिंग्लज    सुनीता चंद्रकांत रेगडे
पेठवडगाव    ऐश्‍वर्या सचिन पवार
पन्हाळा    इंद्रायणी मारुती माने
मुरगूड    अनिता संजय जाधव
मलकापूर    स्वाती सुरेश डोळस

Web Title: tanishka election kolhapur