महिलांच्या उत्साहामुळे तनिष्का निवडणूक गाजली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नगर -महिलांमधील उत्साहाचे दर्शन आज नगर शहरात दिसून आले. तनिष्का व्यासपीठच्या निवडणुकीसाठी सकाळपासूनच महिलांनी रेसिडेंशियल हायस्कूलच्या केंद्राकडे पाय वळविले. प्रचारातून निर्माण केलेल्या वातावरणाचा उत्साह निवडणुकीच्या निकालानंतरही कायम होता. 

तनिष्का व्यासपीठाच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान शहरात झाले. अंजली देवकर-वल्लाकट्टी, वैशाली ससे, सविता मोरे, सुनीता विद्यासागर आणि रेखा जरे पाटील या निवडणुकीतील उमेदवार होत्या. सर्व उमेदवारांनी सकाळी मतपेटीची पूजा करून मतदानास प्रारंभ केला. विविध क्षेत्रांतील महिला, महाविद्यालयीन तरुणींनी मतदानासाठी रांग लावली. महापौर सुरेखा कदम, माजी महापौर शीला शिंदे यांनीही उत्सुकतेपोटी मतदान केंद्रास भेट देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेत त्यात सहभाग घेतला. दुपारी दोननंतर मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरवातीला प्रत्यक्ष झालेली मतांची मोजणी करण्यात आली. नंतर ऑनलाइन मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये अंजली देवकर-वल्लाकट्टी यांना प्रथम क्रमांकाची मते मिळाली. मतमोजणीनंतर सर्व उमेदवारांनी एकत्रित जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. कल्याण पागर यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांना प्रियंका पिसोरे, भावना वाळूंजकर, विद्या कांडेकर यांनी सहकार्य केले. 

Web Title: Tanishka election in nagar