नवरात्रोत्सवाची संधी; प्रचारासाठी भिंगरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

‘तनिष्कां’च्या निवडणुकीला चढू लागला रंग - ११० महिला उमेदवार रिंगणात

सांगली - ‘तनिष्का’ निवडणुकीसाठी उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रचाराचा धडाका लावला आहे. नवरात्रोत्सवाची संधी साधत रास-दांडियाच्या ठिकाणी जाऊन त्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे प्रचाराला चांगलाच रंग चढू लागला आहे. एकेका महिलेची भेट घेऊन मतदानासाठी आवाहन केले जात आहे. जिल्ह्यात ११० महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत.  

सामाजिक बदलाची गुढी उभारून विविध उपक्रमांत सक्रिय तनिष्का निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. १६ ऑक्‍टोबरला सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत निवडणूक आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. लवकरच त्याची घोषणा केली जाईल. प्रत्यक्ष व आधुनिक तंत्राने मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे रंगत वाढली आहे.

उमेदवारांच्या प्रचाराची लगबग वाढली आहे. तनिष्का व्यासपीठाचा उद्देश तळागाळापर्यंत पोचला आहे. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही निवडणुकीत उतरलोय, असे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारांना सर्वांकडून शुभेच्छा मिळत आहेत. महिला मंडळांच्या ग्रुपच्या बैठकाही सुरू आहेत. सध्या नवरात्रोत्सवाची धामधूम आहे. सांगली, मिरज, कुपवाडसह जिल्हाभर दांडिया रंगतोय. त्या ठिकाणी महिलांची गर्दी आहे. दुर्गामाता मंदिरासह नवरात्रीनिमित्त गावोगावी ग्रामदैवतांचे आशीर्वाद घ्यायला महिला जमत आहेत. तेथे जाऊन प्रचारही केला जात आहे. 

असे आहेत मतदारसंघ 
सांगली शहर, विश्रामबाग, मिरज, कुपवाड, जत, माडग्याळ, उमदी, कवठेमहांकाळ, घाटनांद्रे, शिरढोण, तासगाव, सावळज, सलगरे, तुंग, ढालगाव, आटपाडी, दिघंची, खरसुंडी, पलूस, भिलवडी, कोकरूड, इस्लामपूर, आष्टा, खानापूर, विटा, भाळवणी, लेंगरे, कडेगाव, देवराष्ट्रे, वांगी, खेराडे वांगी.

सोशल साइटवर प्रचार 
फेसबुक, व्हॉटस्‌ॲपसारख्या सोशल साइटद्वारेही उमेदवार प्रचार करीत आहेत. तनिष्का म्हणजे नेमके काय हे सांगितले जात आहे. काहींनी खास ग्रुपही तयार केलेत. महिलांकडून अपेक्षाही जाणून घेतल्या जात आहेत.

Web Title: tanishka election in sangli

टॅग्स