राजापुरात तनिष्कांची रोपवाटिका

केशव कचरे
शनिवार, 19 मे 2018

बुध - पाच हजार रोपनिमिर्तीचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून राजापूर (ता. खटाव) येथील तनिष्का गटाने रोपवाटिका सुरू केली आहे. या उपक्रमास युवक व ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे.

बुध - पाच हजार रोपनिमिर्तीचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून राजापूर (ता. खटाव) येथील तनिष्का गटाने रोपवाटिका सुरू केली आहे. या उपक्रमास युवक व ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत आहे.

गतवर्षीच्या पावसाळ्यात तनिष्का व ग्रामस्थांनी प्राथमिक शाळा, राजापूर हायस्कूल व तलावाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे दहा हजार रोपांची लागवड करून शासनाच्या वृक्षलागवड उपक्रमात आघाडी घेतली होती. वृक्षारोपणासाठी गेल्यावर्षी रोपांचा तुटवडा जाणवल्याने तनिष्कांना लोकवर्गणी जमा करून रोपांची खरेदी करावी लागली होती. हा अनुभव लक्षात घेता तनिष्कांनी येत्या पावसाळ्यात राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपणासाठी सुमारे पाच हजार रोपे स्वतःच तयार करण्याचा निर्णय घेतला. या रोपवाटिकेसाठी लागणारी माती, पिशव्या तसेच आंबा, चिंच, आवळा अशा विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया आदी प्रा. अमृतराव काळोखे यांनी तनिष्कांना विनामूल्य पुरविल्या आहेत. सध्या प्रा. काळोखे यांच्या डाळिंबाच्या बागेत रोपवाटिकेचे काम वेगाने सुरू आहे. तनिष्का गटातील महिला सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाचपर्यंत पिशव्यात माती भरणे, बीजप्रक्रिया केलेल्या बियांचे पिशव्यामध्ये टोकण करणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवून पाणी घालणे अशी कामे करत आहेत. पाच हजार रोपांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तनिष्का गटप्रमुख मनीषा घनवट, छाया घनवट, वैशाली मोहिते, वर्षा घनवट, लता घनवट, जयश्री घनवट, उषा घनवट, शकुंतला घनवट, ज्योती शिरतोडे, वनिता घनवट, गौरी तारळकर, भारती लोटके, सुमन घनवट, नीता लवंगारे, अनुजा घाटगे, जयश्री काळोखे, कविता घनवट, प्राजक्ता कुदळे, शीतल घनवट, मालन घनवट परिश्रम घेत आहेत.

Web Title: tanishka Nursery