फलटण तालुका टॅंकरमुक्त?

व्यंकटेश देशपांडे
शनिवार, 28 एप्रिल 2018

फलटण - फलटण तालुक्‍यात सध्या दररोज वाढीव तापमानाने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा कडक उन्हाळ्यात सुखावह बाब म्हणजे तालुक्‍यात कोठेही पाणीटंचाई जाणवत नाही, ही परिस्थिती अधोरेखित करण्यासारखी आहे. त्याचीच एक सकारात्मक बाजू म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही कोठूनही टॅंकरची मागणी झालेली नाही. एकूणच फलटण तालुका टॅंकरमुक्त झाल्याचे जाणवते आहे. 

फलटण तालुक्‍याच्या गेल्या ४० वर्षांच्या इतिहासात ऐन उन्हाळ्यात मुबलक पाणी असल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. त्यामागे धोम- बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाची किमया अशीच भावना ग्रामीण जनतेच्या मनात असल्याचे दिसून येते. तालुका पाणीटंचाई व दुष्काळमुक्त करण्याचा ध्यास घेऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर राजकारणात आले. त्यांच्या कार्यपद्धतीतून टॅंकरमुक्त तालुका होतानाच शिवारात मोकळेपणाने फिरणारे पाणीही जनतेसमोर आल्याचे दिसते. आतापर्यंत दर वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पूर्व भागातील वांझोळ, तसेच पश्‍चिम भागातील हिंगणगाव, वाघोशी, धुमाळवाडी परिसरातून वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची मागणी होती. यावर्षी ऐन कडक उन्हाळ्यात एकाही टॅंकरची मागणी झालेली नाही. त्यावरून तालुका पाण्याच्या बाबतीत समृद्ध होत असल्याचे चित्र आहे.

विहिरींतही मुबलक पाणी!
सध्या तालुक्‍यात धोम- बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी शिवारात खळाळत आहे. पाझर तलाव भरून घेण्यात येत असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, असेच दिसते. धोम प्रकल्पाच्या कालव्यातून ओढ्यात पाणी सोडल्याने ऐन उन्हाळ्यात काही ओढे खळाळून वाहत आहेत. परिणामी परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

Web Title: tankerfree faltan tahsil water dhom-balkavadi project water