Tasgao market was opened on the 58th day
Tasgao market was opened on the 58th day

ही व्यापारपेठ झाली 58 व्या दिवशी खुली

तासगाव (जि. सांगली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च पासून बंद असलेले तासगाव शहरातील दुकाने 58 व्या दिवशी सुरू झाली. एक दिवस एक बाजू याप्रमाणे दुकाने सुरू रहाणार आहेत. रविवारी पूर्ण बंद रहाणार असल्याचे खासदार संजय पाटील यांनी प्रशासणाबरोबर झालेल्या बैठकीनंतर जाहीर केले. 

लॉकडावूनचा चौथा टप्प्यामध्ये दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी दिली असल्याने पालिकेत त्यावर निर्णय घेण्यासाठी व्यापाऱ्याना बोलविण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी वर्गात अस्वस्थता होती त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने दहा वाजताच पालिकेच्या आवारात व्यापारी, दुकानदार जमले होते. खासदार संजयकाका पाटील हे ही पालिकेत आले

त्यांनी नगराध्यक्ष डॉ विजय सावंत, मुख्यअधिकारी गणेश शिंदे, यांच्यासह पदाधिकारयांशी चर्चा केली. शहरातील दुकाने सुरू करण्याचा आराखडा तयार करून व्यापाऱ्यासमोर मांडण्यात आला. सर्व रस्त्यावरील समोरासमोरील दुकाने एक आड एक दिवस सुरू राहणार आहे. आठवड्यात एक आड एक असे तीन दिवस प्रत्येक दुकान सुरू राहील रविवारी बंद रहातील. खासदार पाटील यांनी गेली 57 दिवस व्यापाऱ्यानी पालिकेला केलेल्या सहकार्यामुळे अद्याप तासगाव शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही यापुढेही असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा केली.
 

पालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे कौतुक त्यांनी केले.शहरातील व्यवहार सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारयांशी चर्चा केली आहे योग्य ती खबरदारी घेऊन प्रसासनाच्या सूचनांचे पालन करून दुकाने सुरू करावीत असे आवाहन त्यांनी केले., यावेळी पक्षप्रतोद अनिल कुत्ते, नगरसेवक बाबासाहेब पाटील, जाफर मुजावर, बाळासाहेब गुजर, राष्ट्रवादी चे अभिजित माळी बाळासाहेब सावंत, राष्ट्रवादि चे शहराध्यक्ष अमोल शिंदे, राहुल शिंदे, दिग्विजय पाटील, अरुण साळुंखे, सचिन पाटील विशाल शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
 

बाहेरून येणाऱ्यांना कम्युनिटी क्वारंटाईन 
खासदार संजयकाका पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, नगराध्यक्ष डॉ सावंत मुख्यअधिकारी श्री शिंदे यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांच्या झालेल्या बैठकीत शहरात बाहेरून येणाऱ्याना कम्युनिटी क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com