भाजप, राष्ट्रवादीला तासगावकर विटले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

तासगाव : तासगाव पालिकेवर कॉंग्रेसपक्षाचा झेंडा फडकणार यामध्ये कोणतीही शंका नाही, भाजप आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराला तासगावकर जनता विटलेली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी तासगाव येथे प्रचार सभेत बोलताना केले. भयमुक्‍त आणि भ्रष्टाचारमुक्‍त तासगावसाठी कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या कॉंग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सांगता सभेत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी खासदार प्रतीक पाटील, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाबकाका पाटील, वल्लभदास शेळके, रवींद्र साळुंखे, सुनील पाटील, महेश पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजीराव शिंदे उपस्थित होते. 

तासगाव तालुक्‍यात कॉंग्रेसला मोठी परंपरा आहे, तासगाव तालुक्‍याचे सरचिटणीस असलेले वसंतदादा देशात कॉंग्रेसचे सरचिटणीस होते. तासगावमधील लढाई ही धनशक्‍ती विरुद्ध जनशक्‍ती अशी आहे. त्यामध्ये जनता कॉंग्रेसबरोबर असल्याचे प्रतिपादन डॉ. कदम यांनी केले. विधान परिषदेच्या निवडणुकीतील कॉंग्रेसचा विजय म्हणजे शुभशकुन असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या तासगाव दौऱ्याची त्यांनी खिल्ली उडविली. 

प्रतीक पाटील यांनी भाषण केले. महादेव पाटील यांनी भाजपवर हल्ला चढवून मुख्याधिकाऱ्याच्या घरावर हल्ले करणारे नगरसेवक जर असतील तर नागरिक किती सुरक्षित राहतील याचा विचार करा. कॉंग्रेसला संधी द्या आणि चिंचणी, अंजनीतील रिमोट कंट्रोल दूर करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गुलाबकाका पाटील, महेश पाटील, वल्लभदास शेळके, रवींद्र साळुंखे, राहुल कांबळे, महेश पाटील, सुनील पाटील यांची भाषणे झाली.

Web Title: Tasgaon elections: Congress slams BJP, NCP