राष्ट्रीय महामार्गाखालील पाईपलाईनबाबत तासगाव पालिका ऍक्‍शन मोडमध्ये

Tasgaon Municipality in action mode regarding pipeline under National Highway
Tasgaon Municipality in action mode regarding pipeline under National Highway

तासगाव (जि. सांगली)  : तासगाव शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाखाली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्या गेल्या असून पालिका प्रशासनाला धक्का दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे आले आहे. मुख्याधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांनी "वस्तुस्थिती" ची पहाणी केली. यावर सत्ताधारी गटाची भूमिका प्रशासनावर खापर फोडण्याची अशी दिसत आहे. 

दै. सकाळने 3 मार्चच्या अंकात गुहागर विजापूर महामार्गाखाली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन अडकल्याचे वृत्त देऊन या विषयाला वाचा फोडली.50 हजार लोकसंख्येच्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा भविष्यात धोक्‍यात येऊ शकतो असे असूनही पालिकेचे पदाधिकारी अथवा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

सन 2018 पासून ही पाईपलाईन रस्त्यातून बाजूला घेण्यासाठी केवळ पत्रव्यवहार होत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याने आणि हा धक्कादायक प्रकार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत काम सुरू असताना फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम पालिका करत होती. 

दरम्यान आज पालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण रस्त्यावर फिरून माहिती घेतली. तासगाव निमणी दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन पाईपलाईन रस्त्याखाली येत असून त्यापैकी एकपूर्ण तर दुसरी पाईपलाईन दोनशे मीटर रस्त्याखाली जात असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र देण्यात आले असून दोन दिवस त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत असल्याची माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी दिली. एकीकडे पालिका प्रशासन ऍक्‍शन मोड मध्ये आलेले दिसत असताना सत्ताधारी पदाधिकारी मात्र यावर काही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. भविष्यात शहराचा पाणीपुरवठा धोक्‍यात येण्याची शक्‍यता असताना सत्ताधारी गोटातून सगळे खापर प्रशासनावर फोडण्याचे प्रयत्न होत आहेत. खासदार अथवा नगराध्यक्ष यावर बोलण्यास तयार नाहीत. 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com