तासगावच्या मटका साम्राज्याला दणका 

रवींद्र माने
शुक्रवार, 30 जून 2017

तासगाव - तब्बल 27 मटका धंदेवाईक हद्दपार करून तासगाव शहर आणि तालुक्‍यात मटक्‍याचे साम्राज्य उद्‌ध्वस्त केले आहे. मात्र एवढी मोठी कारवाई करून तरी मटका थांबणार काय ? याबाबत साशंकताच आहे. इतिहासातील सर्वांत मोठी कारवाई असेच वर्णन या कारवाईचे करावे लागेल. 

तासगाव - तब्बल 27 मटका धंदेवाईक हद्दपार करून तासगाव शहर आणि तालुक्‍यात मटक्‍याचे साम्राज्य उद्‌ध्वस्त केले आहे. मात्र एवढी मोठी कारवाई करून तरी मटका थांबणार काय ? याबाबत साशंकताच आहे. इतिहासातील सर्वांत मोठी कारवाई असेच वर्णन या कारवाईचे करावे लागेल. 

तासगाव तालुक्‍यात मटक्‍याचे किती मोठे साम्राज्य उभे आहे. हे जिल्हा पोलिस प्रमुखांनी केलेल्या हद्दपारीच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 57 जणांपैकी 27 जण तासगावातील आहेत. यावरून हा विळखा किती घट्ट होता हे समजून येते. गेल्या अडीच वर्षांत तालुक्‍यातील बहुतांशी गावात या मटक्‍याने आपली पाळेमुळे चांगलीच रुजविली आहेत. शाळेतील मुलांपासून ते शेतमजूर महिलांपर्यंत या मटक्‍याचे व्यसन लागले आहे. दररोज कोट्यवधीची उलाढाल होते आहे. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाया या वरवरच्या आणि रेकॉर्ड बनविण्यापुरत्या होत्या. त्यामुळे मटका चालविणाऱ्यांच्यापर्यंत पोलिस कारवाई कधीच पोहोचली नव्हती. मटक्‍याच्या धाडीत पंटर सापडायचे ! बुकी मात्र नामानिराळे असा प्रकार सुरू आहे. 

तासगाव तालुक्‍यातील तब्बल 27 जणांना तडीपार करून मटक्‍याच्या साम्राज्याला हादरा देण्याचे काम पोलिसांनी केले आहे. याची सुरवात सात-आठ महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी भगत आणि जाधव या बुकींच्या पूर्ण टोळ्याच कारवाईच्या कक्षेत आणल्या होत्या. त्यावेळी सुरू झालेल्या कारवाईची इतिपूर्ती इतिहासातील सर्वांत मोठी हद्दपारी होऊन झाली. आता झालेल्या कारवाईत विलास जाधव, संतोष राक्षे आणि "बडा मासा' अविनाश भगत हद्दपार झाले आहेत. मात्र या कारवाईमुळे मटका संपला म्हणजे धाडसाचे ठरणार आहे. कारण मोकळ्या झालेल्या जागा भरण्यासाठी फौज तयारच आहे. शिवाय अजून अनेक बडे मासे मोकळेच आहेत. मटक्‍याच्या जोडीला आता चोरटी दारू आली असल्याने या मंडळींची ताकद वाढू लागली आहे. शिवाय जोडीला राजकीय पाठबळ आहेच ! 

या मटक्‍याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय संरक्षण आहे. हे यांना हद्दपारीसाठी अटक केल्यानंतर दिसून आले. तासगाव पोलिस ठाण्यात चक्‍क यांना "टाटा' करण्यासाठी शेकडो ""कार्यकर्ते'' गोळा झाले होते. त्यामध्ये आजी माजी नगरसेवक, वाळू वाले, पालिकेतील ठेकेदार दिसत होते. 

Web Title: tasgaon news matka satta