येरळा नदी पात्रातील विहिरी ३५ फुटांखाली

रवींद्र माने
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पाणी सोडण्याची मागणी - खरीपसह बागायती पिकांना धोका

तासगाव - तालुक्‍यातील येरळा काठची शेती पाण्याअभावी धोक्‍यात आली आहे. येरळेत तातडीने  पाणी न सोडल्यास पिके वाया जातील अशी स्थिती आहे. येरळा नदीच्या पात्रातील विहिरींच्या पाण्याची पातळी ३०-३५ फुटांखाली गेली आहे. ताकारीचे पाणी तासगाव तालुक्‍यात येतच नाही.

पाणी सोडण्याची मागणी - खरीपसह बागायती पिकांना धोका

तासगाव - तालुक्‍यातील येरळा काठची शेती पाण्याअभावी धोक्‍यात आली आहे. येरळेत तातडीने  पाणी न सोडल्यास पिके वाया जातील अशी स्थिती आहे. येरळा नदीच्या पात्रातील विहिरींच्या पाण्याची पातळी ३०-३५ फुटांखाली गेली आहे. ताकारीचे पाणी तासगाव तालुक्‍यात येतच नाही.

पावसाने दांडी मारल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना येरळा काठची शेती, गावात दुष्काळ जाणवू लागला. पाच महिन्यांहून अधिक काळ येरळेत पाणी आलेले नाही. ताकारीचे पाणी दोन महिन्यांपूर्वी पलूस तालुक्‍यातील मोराळे बंधा-यापर्यंत आले. यावर्षी उन्हाळ्यात पाणीच आले नाही. ताकारी योजनेतून सोडण्यात आले नाही. येरळेतील विहिरी पूर्ण कोरड्या पडू लागल्यात. जॅकवेलमधून मिळणारे पाणी दिवसावरून दोन-तीन तासांवर आले. येरळेत असलेल्या राजापूर येथील जॅकवेलमध्ये पाणीपातळी पस्तीस फुटांवर गेली आहे. निमणीपर्यंत तिने चाळिशी ओलांडली. येरळा काठी राजापूर, बोरगाव, शिरगाव, ढवळी, निमणी, तासगाव, बेंद्रीत शेकडो एकर शेती आहे. काही वर्षे नदीपात्रात वर्षभर पाणी रहात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी योजना झाल्या. राजापूरपासून शिरगावपर्यंत शेकडो जॅकवेलच्या रिंगांतून पाणी उपसा करून शेतीला दिले जाते. येरळेपासून पाच-सहा किलोमीटर अंतरातील योजना झाल्या आहेत. उसासह द्राक्षशेतीही वाढली. मात्र सारी शेती पाऊस आणि येरळेत पाणी नसल्याने धोक्‍यात आली आहे. 

ताकारीचे पाणी पलूस तालुक्‍याच्या हदीपर्यंत येत असल्याने तालुक्‍यातील येरळाकाठच्या शेतकऱ्यांना पावसावर भरवशा ठेवून राहण्याची वेळ आली. येरळा काठचे शेतकरी ताकारीचे पाणी येरळेत सोडावे यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यापूर्वी अनेकदा ताकारीचे पाणी निमणी, शिरगाव बंधारा भरेपर्यंत  सोडण्यात आले. सध्या ऐन दुष्काळात पाणी मिळत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात.

वाळू उपशामुळे पाणी धारण क्षमता कमी
येरळाकाठच्या ज्या गावांसाठी पिण्याच्या पाणी योजना येरळेतून आहेत. त्यात ढवळी, राजापूर, तुर्चीच्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.  राजापूर येथे दिवसआड पाणी दिले जाते. तर ढवळीची योजना बंद पडली आहे. वाळू उपशामुळे येरळापात्राची पाणी धारण क्षमताही कमी झाली आहे.

Web Title: tasgav sangli news yerala river well water 35 feet deep